योग्यवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ - मुख्यमंत्री

मलबार हिल - सोमवारी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. परिस्थिती आली तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपा आणि शिवसेनेला मिळालेल्या मतदानांमुळे विरोधी पक्ष निराश झाले आहेत. त्यांच्याकडे काही मुद्देच शिल्लक राहिले नाहीत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय शिवसेना आणि भाजपात काही मुद्द्यांवरून मतभेद आहेत. पण राज्याच्या हितासाठी आम्ही राज्य सरकारमध्ये एकत्र आहोत.

"18 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. शेतकरी नुकसान भरपाई म्हणून 894 कोटी रुपये खरीप-रब्बीसाठी दिले आहेत. फक्त लातूरसाठी 402 कोटी रुपये दिले जात आहेत. शेतकऱ्यांकडून धान्य घेत असल्याने सरकारी गोदामही सर्व भरली आहेत. आता खासगी गोदामही भाड्याने घेतली जात आहेत. मात्र शेतकऱ्याना हमीभाव देत असल्याने फायदा मिळत आहे," असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या