'विकास दर उंचावण्यासाठी IMG प्रयत्नशील'

नरिमन पॉईंट - येत्या काही वर्षात विकास दर अजून उंचावण्याची शक्यता आहे. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीने 2020 पर्यंत 10 टक्के जीडीपी वाढवण्यावर भर दिलाय. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्यावतीनं नरिमन पाईंट येथे आयएमसी ऑफ कॉमर्स क्लब मध्ये परिसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यावेळी यात सहभागी पॅनल सदस्यांनी 2020 पर्यंत देशांर्गत उत्पादन वाढवण्यावर चर्चा केली. 10 टक्के देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी तीन मुख्य घटकांनी म्हणजेच कृषी, उत्पादन आणि सेवा एकत्रीतरित्या वाढ करणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी सहभागी पॅनलने नोंदवले. 2015-16 मध्ये भारताने 7.6 टक्के विकास दर नोंदवला होता. यावेळी आयएमसीचे सर्वसाधारण संचालक अरविंद प्रधान, उपाध्यक्ष ललित कनोडिया, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी खासदार पवन वर्मा, अध्यक्ष दीपक प्रेमनारायेन, वरिष्ठ पत्रकार संजय पगुलिया, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी, भाजपचे राष्ट्रीय सचिव सिध्दार्थ नाथ सिंग उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या