ठाकरे गटाला शिंदेंकडून 'दे धक्का', वांद्र्यातच पक्षाला पडले खिंडार

मुंबईतील वांद्रे विधानसभेतील प्रभाग क्रमांक 99 चे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह वांद्रे खार दांडा परिसरातील असंख्य कोळी बांधव उपस्थित होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी 2014 साली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. रायगड जिल्ह्याचे ते संपर्कप्रमुखही होते. तसेच खार दांडा शाखेचे ते शाखाप्रमुख पदही काही वर्षे त्यांनी भूषवले होते. 2007 ते 2012 असे दोन टर्म ते उबाठा गटाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

दसरा मेळाव्याआधीच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला असून यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी त्यांच्यासह उबाठा गटाचे उपशाखाप्रमुख विकास चव्हाण, गटप्रमुख विजय खरपुडे, अजय शिगवण, संतोष ठाकूर, नंदू निकम, सनी टिळेकर यांनीही देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 


पुढील बातमी
इतर बातम्या