भाजपाची मध्यावधी निवडणुकीची तयारी?

मुंबई - विधानसभेत विरोधकांच्या 19 आमदारांच्या निलंबनानंतर राजकीय समीकरणांवर भाजपाच्या कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आणि भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने यावेळी नवीन राजकीय समीकरणावर चर्चा केली. 

काँग्रेसचे 15 आणि एनसीपीचे 14 आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. या आमदारांना आता पक्षात घ्यायचे की मध्यवर्ती निवडणुकांना सामोरे जायचे याबद्दल चर्चा करण्यात आली. यात 30 पैकी 22 आमदार मध्यावधी निवडणुकींमध्ये पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे. याबाबत झालेली चर्चा नवी दिल्लीला कळवण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

पुढील बातमी
इतर बातम्या