निवडणूक अधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी मंत्री जानकर दोषी

मुंबई - राज्य निवडणूक आयोगानं पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्यविकास कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांना गडचिरोलीमधील देसाईगंज नगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यावर फोन करून दबाव टाकल्याप्रकरणी दोषी धरलंय. निवडणूक आयोगानं आपल्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की महादेव जानकर यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि एखाद्या उमेदवाराला विशिष्ट चिन्ह द्यावं असं सांगितलंय. निवडणूक आयोगानं निर्णय देण्याच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी महादेव जानकर यांना क्लिनचिट दिली होती. काँग्रेसतर्फे राज्य निवडणूक आयोगामध्ये महादेव जानकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या