राज्याच्या पशुसंर्वधन, मत्स्यव्यवसायाची ब्रँड अॅम्बेसेडर कतरिना कैफ असणार आहे याबाबतची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली. इतर अभिनेत्यांशी यासंदर्भात बोलणी सुरू आहे जेणेकरून पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसायाला चालना मिळेल, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली. राज्यात काही ठिकाणी प्लॅस्टिकची अंडी मिळण्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याबाबतही अन्न आणि औषध पुरवठा प्रशासनाला तपास करण्याचे आदेश दिल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली.