महापालिकेतर्फे चाचा नेहरु क्रीडांगणाचे लोकार्पण

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

मालाड - मुंबई महानगरपालिकेतर्फे मालाड पश्चिम येथील चाचा नेहरू क्रीडांगणाचं लोकार्पण महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते मंगळवारी झालं. या वेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या चाचा नेहरू क्रीडांगणाचं एकूण क्षेत्रफळ 19 हजार 600 चौरस मीटर आहे. या भूखंडावर खेळांशी संबंधित सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसंच सुशोभीत प्रवेशद्वार, पदपथ, स्केटिंगसाठी जागा, खुली व्यायामशाळा, लहान मुलांसाठी खेळणी, हॅण्डबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, उंच उडीसाठी जागा, क्रिकेटची खेळपट्टी, कबड्डी आणि खो-खो मैदान, धावण्यासाठी जागा अशा सुविधा येथे देण्यात आल्या आहेत. या क्रीडांगणासाठी सुमारे 4 कोटी 81 लाख रुपये खर्च आला आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम, स्थानिक नगरसेविका अनघा म्हात्रे , शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या