लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी सायंकाळी ६ वाजता संपलं. शनिवारपासून सलग दोन सुट्ट्या जोडून आल्याने मुंबईकर मतदानाला दांडी मारतील की काय? अशी शंका व्यक्त होत असताना मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मतदान करत ही शंका फोल ठरवली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात ५७ टक्के मतदान झालं. तर मुंबईत सरासरी ५४.३० टक्के मतदान झालं. राज्यात एकूण ४ टप्प्यात६१ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यासाठी राज्यभरातील ५ कोटी ३७ लाख मतदारांनी आपला हक्क बजावला.
चौथ्या टप्प्यात नाशिक, धुळे, शिर्डी, शिरूर, मावळ, मुंबई, ठाण्यासहित १७ ठिकाणी मतदान घेण्यात आलं. शनिवारपासून सलग २ दिवस असलेल्या सुट्ट्या, शाळा-काॅलेजांच्या आटोपलेल्या परीक्षा तसंच उन्हाचा पारा चाळीशीत गेल्यामुळे मतदानाचा टक्का घसरणार काय? या भीतीपोटी सर्वपक्षीय उमेदवारांच्या पोटात गोळा आला होता.
निवडणुकीची थोडक्यात वैशिष्ट्ये -
संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची आकडेवारी
परंतु विकेंडची मजा लुटण्यासाठी सहलीला किंवा गावी न जाता मोठ्या संख्येने मुंबईकर मतदानासाठी रस्त्यावर उतरले. यांत बाॅलिवूडकर आणि उद्योजकांचा सहभाग देखील लक्षणीय होता. अमिताभ बच्चन आणि कुटुंबिय, सलमान, शाहरूख आणि आमिर खान, रणबीर कपूर, रणवीर सिंह, हृतिक रोशन, अभिनेत्री माधुरी दिक्षित, प्रियंका चोप्रा, करीना कपूर, दीपिका पदुकोन या तारे-तारकांसोबत, अनिल अंबानी, मुकेश अंबानी, पवन गोयंका, आदी गोदरेज, एन. चंद्रशेखरन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही मतदान केलं.
शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने विविध मतदार जनजागृतीचे उपक्रम राबवले होते. त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसत आहे.
हेही वाचा-
म्हणून राज ठाकरे भडकले, पावणे दोन तासाने लागला मतदानासाठी नंबर