पालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार?

लोकसभा निवडणुकीनंतर आता लवकरच पालिका निवडणूक होणार आहे. या महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी भाजपाही तयारी लागली आहे. अशातच राज्यातील सत्ताधारी पक्ष एकत्र ही निवडणूक लढलणार का असा सवाल वारंवार उपस्थित करण्यात आला आहे. यावर 'मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढवण्याबाबतचा निर्णय महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील', असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत.

'मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीनं एकत्र येऊन लढण्याचं ठरलं आहे', असं मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिला. त्यामुळं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करीत आहेत.

'मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षसंघटना बांधणीच्या कामास गेल्या फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. त्यासाठी सभा सुरू झाल्या होत्या, परंतु कोरोनामुळे ते काम थांबलं. आता सभा, बैठका पुन्हा सुरू झाल्या आहेत. रविवारी नितीन देशमुख यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं', असं मलिक यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या