नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यावर महाविकास आघाडी ठाम

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. त्यांना अटक झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. पण नवाब मलिकांचं मंत्रिपद कायम ठेवण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला आहे.

बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आज मंत्रालयाजवळ महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार आंदोलन करणार आहे. तर, शुक्रवापासून जिल्हा पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे.

नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपकडून आजपासून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. मलिकांना अटक करण्यात प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे मलिक राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

बुधवारी, ईडीनं नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीनं नवाब मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीनं ही कारवाई सुरू केली.


हेही वाचा

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडी कोठडी

पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल - किरीट सोमय्या

पुढील बातमी
इतर बातम्या