राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर याचं गुरूवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी फुंडकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. फुंडकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक खंबीर शेतकरी नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. विदर्भातील भाजपाचे मोठे ओबीसी नेते अशी त्यांची ओळख होती.

पांडुरंग फुंडकर १९७८ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. भाजपातील ते पहिल्या फळीतील नेते होते. फुंडकर यांनी युवा मोर्चा सोबतच विरोधी पक्षनेतेपद देखील सांभाळलं होतं.

पुढील बातमी
इतर बातम्या