३६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

 महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी विधीमंडळाच्या प्रांगणात पार पडला. यावेेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदी उपस्थित होते. 

सरकार स्थापन झाल्यानंतर ३४ दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार झाला. अजित पवार यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. त्यांचे नाव पुकारल्यानंतर अजित पवार समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.  काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 

मंत्रीमंडळात यांचा समावेश 

कॅबिनेट मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री) 

नवाब मलिक 

दिलीप वळसे पाटील 

हसन मुश्रीफ 

बाळासाहेब पाटील 

अनिल देशमुख 

जितेंद्र आव्हाड 

धनंजय मुंडे 

राजेश टोपे 

डॉ. राजेंद्र शिंगणे 

आदित्य ठाकरे 

गुलाबराव पाटील 

संजय राठोड 

दादा भुसे 

अनिल परब 

शंभुराजे देसाई 

उदय सामंत 

संदीपान घुमरे 

शंकरराव गडाख 

अशोक चव्हाण 

के सी पडवी 

विजय वडेट्टीवार 

अमित देशमुख 

सुनिल केदार 

यशोमती ठाकूर 

वर्षा गायकवाड 

अस्लम शेख 


राज्यमंत्री 

अब्दुल सत्तार 

बच्चू कडू 

सतेज(बंटी) पाटील 

विश्वजीत कदम 

दत्तात्रय भरणे 

आदिती तटकरे 

प्राजक्त तनपुरे 

संजय बनसोडे 

राजेंद्र पाटील यड्रावकर 


पुढील बातमी
इतर बातम्या