आमदार अनिल गोटे यांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई - विधान परिषद बरखास्त करा, अशी जाहीर मागणी करणारे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांना विधानपरिषदेचा अवमान केल्याप्रकरणी 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे.
विधान परिषदेचे सदस्य हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे नेते भाई जगताप, शेकापचे जयंत पाटील यांनी आमदार गोटेंच्या विधानाबद्दल आक्षेप घेतला होता. त्यावर, उत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दिली. तसेच, तीन दिवसांत या नोटीशीला उत्तर देण्याचे सांगण्यात आले असून खुलासा न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही बापट म्हणाले.

शुक्रवारी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या विधानाला राज्य शासन समर्थन करत नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती. तसेच, मुख्यमंत्र्यांनी अनिल गोटे यांना बोलावून अशी भूमिका मांडू नये असे बजावले होते. अशा परिस्थितीमध्येही आमदार अनिल गोटे यांनी विधान परिषद बरखास्त करावी, अशी ठाम भूमिका कायम ठेवली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या