अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची पक्षातून हकालपट्टी ?

शरद पवार किंवा पक्षातील नेत्यांना विश्वासात न घेता एकाएकी भाजपासोबत हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अजित पवारांची  पक्षातून  हकालपट्टी होऊ शकते, मात्र असे झाल्यास अजित पवार यांना समर्थन देणारे २२ आमदार फुटण्याची देखील शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना १२.३० वाजता एकत्ररित्या वाय. बी. सेंटर मध्ये पत्रकार परिषद घेणार त्यात पवार ही घोषणा करू शकतात.

राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत येत सरकार स्थापन केले. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडला. राष्ट्रवादी विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादी पक्षात आणि पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे चिन्ह आहे. याच आशयाचे व्हाट्स अप स्टेट्स शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तत्पुर्वी, अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील २२ आमदारांसहित भाजपला पाठिंबा दिला असल्याचे समजत आहे. याचे रीतसर समर्थन पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना धाडण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या