इतिहासात हा दिवस काळ्या अक्षरांनी लिहिला जाईल - अहमद पटेल

अजित पवारांनी रातोरात घेतलेली भूमिका ही खरचं धक्कादायक आहे, पण भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. ऐवढंच नाही तर संविधानाची अवहेलना करत भाजपने शपथविधी उरकला. इतिहासात हा दिवस काळ्या अक्षराने लिहिला जाईल. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी काँग्रेसने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी काँग्रेसचे नेते मल्लिकाअर्जून खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह असंख्य काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

राज्यात भाजपाने रातोरात अजित पवार यांच्याशी हात मिळवणी करत, शपतविधी उरकल्याने राज्याच्या राजकारणात शनिवारी राजकिय भूकंप झाला. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ठ केली. मात्र या पत्रकार परिषदेला उपस्थित न राहता काँग्रेस नेत्यांनी स्वंतत्र पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी ‘अजित पवार यांनी घेतलेला निर्णय धक्कादायक असून भाजपने सत्तेसाठी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. संविधानची अवहेलना करत भाजपने शपत विधी उरकला, हे इतिहासात ठळकपणे नमूद केले जाईल असे अहमद पटेल म्हणाले.

तर सत्तास्थापनेबाबत काँग्रेसनेच उशिर केल्याच्या उत्तराला प्रतिउत्तर देत पटेल यांनी ‘राज्यपालांनी सर्व पक्षांना सत्तास्थापनेची संधी दिली. मात्र काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी बोलवलेचं नाही. तर मग उशिर कसा होईल. मूळात आम्हच्या मुळे नाही. तर शरद पवार यांनी २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी शपतविधी घेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे सत्तास्थापनेला वेळ झाल्याचे पटेल यांनीनमूद केले.  तसेच अजित पवारांबरोबर जाणाऱ्या आमदारांविरोधात तिन्ही पक्ष एकत्रित लढून पक्षाविरोधात जाणाऱ्या सदस्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशी माहिती पटेल यांनी माध्यमांना दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या