महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक: भाजपचा महाविकास आघाडीला दे धक्का, पहा विजेत्यांची यादी

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीमध्ये विजयी झाले. तर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मतं फुटली असून त्यांना पहिल्या पसंतीची केवळ 41 मतं मिळाली आहे. 

नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरस निर्माण झाली. शेवटी प्रसाद लाड यांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. त्याचसोबत पहिल्या फेरीत मागे असणारे काँग्रेसचे भाई जगताप विजयी ठरले.

विधानपरिषदेतील विजयी उमेदवार

रामराजे निंबाळकर- 28

एकनाथ खडसे- 29

आमश्या पाडवी- 26

सचिन अहिर- 26

प्रवीण दरेकर- 29

राम शिंदे-30

श्रीकांत भारतीय- 30

उमा खापरे- 27

प्रसाद लाड- 28

भाई जगताप- 26

पुढील बातमी
इतर बातम्या