उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेता

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अजय चौधरी यांची गटनेता म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेता असतील.

विधिमंडळ सचिवालयानं एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.  त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 

तसेच सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करुन भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असं पत्र विधानमंडळ सचिवानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठवले आहे.

शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती आता रद्द करण्यात आली आहे. तसा आशयाचं एक पत्र विधानमंडळ सचिवानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटनेतेपदी कायम ठेवण्यात आलं आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना सोमवारी (उद्या) बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या