सिनेटमधून मनविसेची माघार?

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची गुरूवारी शेवटची संधी होती. तत्पूर्वी मनविसेने ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत मनविसेकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नसून गुरूवारी याबाबत अंतिम घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, युवा सेनेसह अभाविपच्या उमेदवारांनी दहाही जागांसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती कळत आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलं असून विद्यार्थी संघटनांनी यासाठी जोरदार तयारी सुरू केली होती.

या निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार गुरूवारपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता होता. यावेळी युवा सेना आणि अभाविपतर्फे १० जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

मनविसेने मात्र या निवडणुकीतून माघार घेण्याचे ठरविल्याची माहिती समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर गुरूवारी होणाऱ्या बैठकीनंतर याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता मनसेच्या सूत्रांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या