राष्ट्रवादीत फुट! अजित पवारांना 'या' मोठ्या 25 आमदारांचा पाठिंबा

अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. संध्याकाळी शपथविधी पार पडू शकतो. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीत फुट पडल्याची माहिती समोर येत आहे.  

एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांना छगन भुजबळ, हसनमुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे यांचा साथ आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ असलेल्या अजित पवार आजच राष्ट्रवादीला हादरा देणार का अशीही स्थिती आहे. आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी सुरु होती. या बैठकीनंतर अजित पवार काही आमदारांसह राजकारणाचे दिशेने जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे आजच शपथविधी होऊन काही मंत्री शपथ घेणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या