राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार - संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना इतिहासजमा करण्याचा हा प्रयत्न आहे, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) संपवण्याचा भाजपाचा हा कट आहे. हे त्यांच जुनं स्वप्न होतं. पण शिवसेना अशी संपणार नाही, शिवसेना महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात आहे. आजचा निकाल हा अंतिम निर्णय नाहीए, हे केवळ षडयंत्र आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. 

तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) बाजूने निकाल दिला आहे. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. 

 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) बाजूने निकाल दिला आहे. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. भरत गोगावलेंचा व्हीप योग्य असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.  

राजकीय पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shivsena) मान्यता मिळाली आहे. सुनावणीवेळी ठाकरे गटाचे सुनिल प्रभू, अंबादस दानवे, वैभव नाईक, सुनिल शिंदे तर शिंदे गटाचे राहूल शेवाळे, मंगेश कुडाळकर,भरत गोगावले,बालाजी किणीकर,संजय शिरसाठ उपस्थित होते. 


हेही वाचा

राहुल नार्वेकरांच्या 'या' मुद्द्यांमुळे उद्धव ठाकरेंना धक्का

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी 4000 पोलिस तैनात

पुढील बातमी
इतर बातम्या