मराठा आरक्षण Live - मराठ्यांनी लढा जिंकला, नोकरी-शिक्षणात १६ टक्के आरक्षण

अाझाद मैदानावर मागील १० दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मराठा अारक्षण अांदोलन कार्यकर्त्यांनी मागे घेतलं अाहे. मराठा समाजाला १६ टक्के अारक्षण देण्याची घोषणा केल्यानंतरही मराठा अारक्षण अांदोलन कार्यकर्त्यांच उपोषण सुरू होतं. गुरूवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अाझाद मैदानावर जाऊन अांदोलनकर्त्यांची भेट घेतली. अारक्षण कोर्टात नक्की टिकेल, मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असं अाश्वासन यावेळी उद्धव यांनी दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात अालं. 

विधेयक एकमताने मंजूर 

मराठा आरक्षणासंबंधीचा एटीआर (अॅक्शन टेकन रिपोर्ट) अर्थात कृती अहवाल गुरुवारी विधीमंडळात सादर करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचं विधेयक पटलावर सादर केलं. विधेयक सादर करताच कुठल्याही चर्चेविना हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं राज्यभरातील मराठा समाजाच्या जल्लोषाला उधाण आलं आहे. मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते ठिकठिकाणी मिठाई वाटून आनंद सादर करत आहेत. 

  •  सायं. ५.५० - अाझाद मैदानावरील मराठा अारक्षण अांदोलन कार्यकर्त्यांचं उपोषण मागे.  उद्धव ठाकरेंच्या अाश्वासनानंतर उपोषण मागे         
  • सायं. 5.45 -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आझाद मैदानावर आंदोलनकर्त्यांशी चर्चा
  • सायं. 4.45 - भाजपने प्रामाणिकपणे मराठ्यांना अारक्षण दिले. कोर्टात अारक्षण टिकण्यासाठी वकिलांची फौज उभी करू. भाजपने दिलेले अारक्षण विरोधकांना खुपत अाहे - विनोद तावडे
  •  सायं. 4.30 - मुख्यमंत्री मराठा अारक्षण अांदोलन कार्यकर्त्यांना भेटण्यास अाझाद मैदानावर जाणार
  • दुपारी 3.00 - अजित पवार आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांच्या भेटीला, आत्महत्याग्रस्त आंदोलकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार
  • दुपारी 2.13 - मराठा आरक्षण विधेयक विधानपरिषदेतही चर्चेविना मंजूर
  • दुपारी 1.59 - मराठा आरक्षण विधेयक विधानपरिषदेतही सादर
  • दुपारी 1.47- आझाद मैदानातील आंदोलक उपोषणावर ठाम, राज्यपालांची विधेयकावर सही होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही
  • दुपारी 1.42 - आरक्षण विधेयक कुठल्याही चर्चेविना झालं विधानसभेत एकमताने मंजूर
  • दुपारी 1.40 - मुख्यमंत्र्यांनी मराठाआरक्षण विधेयक सभागृहातील पटलावर सादर केलं
  • दुपारी 1.31 - युवासेना आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल
  • दुपारी 1.20 - राज्यभर जल्लोष सुरू
  • दुपारी 12.20 - मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर
  • दुपारी 12.15 - मराठा आरक्षणावरील कृती अहवाल मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत सादर, सोबतच कायद्याची प्रतही सादर
  • दुपारी 12.10 - मुख्यमंत्र्यांकडून एटीआर विधानसभेत सादर
  • दुपारी 12.00 - मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत गेले नाही - पंकजा मुंडे

एसईबीसीमधून आरक्षणाचा विचार

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गुरुवारी दोन्ही सभागृहात एटीआर सादर करत आरक्षणाचं विधेयक आणलं जाणार आहे. तर हे विधेयक मंजूर करत मराठा समाजाला एसईबीसीमधून आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे.

मराठा संघटना ३० नोव्हेंबरपर्यंत आरक्षण द्या आणि तेही न्यायालयात टिकेल असं आरक्षण द्या यावर ठाम आहे. तर सरकार सर्वांचीच दिशाभूल करत असून ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्याचं म्हणत ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

विरोधक अहवाल सादर करण्यावर ठाम आहेत. त्यामुळं या सर्व आव्हानांना पार करत आरक्षणाचं विधेयक मंजूर करून घेण्याची कसोटी गुरुवारी सरकारला पार करावी लागेल.

तर अधिवेशनाची वेळ वाढवू

गुरुवारी कृती अहवाल सादर करत विधेयक मंजूर करून घ्यावं लागणार आहे. असं असताना अधिवेशनासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे या प्रक्रियेसाठी वेळ कमी पडला तर अधिवेशनाची वेळ वाढवून घेऊ, असे स्पष्ट संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. वेळ वाढवू पण विधेयक याच अधिवेशनात मंजूर करून घेऊ असंही त्यांनी सांगितलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या