‘वर्क फ्राॅम होम’ आणि उन्हाळ्यामुळे वाढलेल्या वीज वापराचं बिल महावितरणकडून आकारण्यात आल्याचं सांगताना मागील ३ महिन्याचं एकरकमी वीजबिल भरणाऱ्या वीज ग्राहकांना वीजबिलात २ टक्के सवलत देण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी केली. शिवाय मागणी करणाऱ्या ग्राहकांना वीजबिलाचे ३ सामान हप्ते करून देण्यात येणार असल्याचंही सांगितलं. वाढीव वीजबिलाच्या तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत नितीन राऊत यांनी ही माहिती दिली.
लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वीज नियामक आयोगाने प्रत्यक्ष जागेवर जावून मीटरवाचन व वीजबिल वितरण न करण्याचे आदेश महावितरणला दिले होते. त्यानुसार महावितरणने मीटर रिडींग व देयक वाटपाचं काम बंद ठेवल्याने एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापराचं वीज बिल आकारण्यात आलेलं आहे.
राज्य सरकारने १ जून २०२० पासून प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात सुरूवात केली आहे. त्यानुषंगाने महावितरणने ग्राहकांना मीटर रिडींगनुसार वीज बिल देण्यासाठी १ जून २०२० पासून प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने मीटर रिडींग, वीज बिल वाटप तसंच वीज बिल संकलन केंद्रे पुन्हा सुरु केलेली आहेत.
हेही वाचा - Electricity Bill: ‘या’ कारणामुळे तुम्हाला आलंय जास्त लाईट बिल
जून-२०२० मध्ये वीज बिलाची रक्कम जास्त दिसण्याचं कारण म्हणजे लॉकडाऊन काळात (एप्रिल व मे महिना) आलेली सरासरी देयके ही कमी सरासरी युनिटने (डिसे. जाने. व फेब्रुवारी ) हिवाळ्यातील वीज वापरावर दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला घरगुती ग्राहकांच्या विजेच्या वापरात Work from Home व उन्हाळ्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा वाढ झालेली आहे जी जूनच्या बिलात दिसून येत असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं.
जूनचं वीज बिल कसं योग्य आहे, हे ग्राहकांना समजावून सांगण्यासाठी तसंच ग्राहकांच्या बिलांचं तक्रारीचं निराकरण करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मुख्यअभियंता, अधिक्षक अभियंता यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
वरील सर्व उपाय योजनांचा वापर करून देखील ग्राहकांचे समाधान न झाल्यास ईमेल आयडी energyminister@mahadiscom.in व मोबईल क्र. 9833567777 व 9833717777 यावरून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन त्वरित करण्यात येईल.
जून २०२० घरगुती ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची पद्धत :
हेही वाचा - ४ पट वीजबिलाचा नवी मुंबईकरांना 'शाॅक'