मराठा 'महा'मोर्चासाठी नियोजन

कोकणनगर -  मुंबईतील मराठा क्रांती (मुक) महामोर्चासाठी स्वयंसेवक नोंदणी आणि नियोजन बैठक रविवारी भांडुपमध्ये झाली. शिवाजी तलाव परिसरातील पराग विद्यालयाच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातून काढल्या जाणाऱ्या मोर्चांचा कळस मुंबईत उभारला जाणार असल्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले.

या बैठकीला मुंबईसह ठाणे परिसरातून हजारो मराठी बांधव-भगिनींनी उपस्थिती लावली. दिवळीच्या आसपास मुंबईत या महामोर्चाचे आयोजन केले जाणार आहे. बैठकीत उपस्थित असलेल्या दोन विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या कार्यक्रमाची सुरूवात केली.

गरीब कुटुंबातील या विद्यार्थिनींनी चांगले मार्क मिळवूनही आपल्याला उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून, मंत्रालयाच्या आणि मंत्र्यांच्या घरांच्या पायऱ्या झिजवूनही पदरी निराशाच पडल्याची व्यथा त्यांनी मांडली.

दीड कोटींची उपस्थिती या मोर्चाला असण्याच्या शक्यतेतून प्राथमिक एक लाख कार्यकर्त्यांची स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यात येणार असून, आणखी एक नियोजन बैठक घेण्यात येणार असल्याचे आयोजक योगेश तावडे यांनी सांगितले.

 

पुढील बातमी
इतर बातम्या