सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदाराचं रहिवाशांना आवाहन

मुंबई - जुन्या इमारतीमधील रहिवाशांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीनं सुयोग्य धोरण कसं राबवता येईल याकरिता शासनास अहवाल सादर करायचा आहे. यासाठी आमदार सुनील शिंदे यांनी रहिवाशांना फेसबूक, व्हॉटस्अप या सोशलसाईटच्या माध्यमातून आवाहन केलं. इमारतींचे पदाधिकारी म्हणून आपणही मला आपल्या इमारती संदर्भात काही सुचना असल्यास कृपया 8 दिवसांत लेखी कळवावे, जेणेकरून शासनाकडे या सुचना मांडू शकेन असे सुनील शिंदे यांनी सांगितले आहे.

शिवसेना आमदार सुनील शिंदे गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं जुन्या इमारतीचा प्रश्न मांडत आहेत. विशेष म्हणजे वरळी ते लोअर परेल भागातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त/बिगर उपकर प्राप्त इमारती/पी.एम.जी.पी इमारती तसेच मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळ यांच्या अंतर्गत येणाऱ्या इमारतींचे अस्तित्व टिकवणे, याबाबत महाराष्ट्र शासनानं रहिवाशांच्या हिताचे धोरण राबवावे यासाठी ते सातत्यानं आग्रही होते. परिणामी याबाबत सरकारनं मुंबई शहरातील आमदारांची विशेष समिती स्थापण केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या