स्मशानभूमीत दिवाळी साजरी

कुर्ला- स्मशानभूमी... चीर शांतता, अंधाराचे पसरलेले साम्राज्य. उजेड होतो तो फक्त चिता पेटल्यावर… पण तिथे आशेचे दिवे लागले… चक्क कुर्ल्यातल्या सोनापूर स्मशानभूमीत दिवाळी साजरी करण्यात आली... तुम्हाला नक्की आश्चर्य वाटलं असेल... पण दिवस-रात्र, ऊनपाऊस याची तमा न बाळगता स्मशानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय? त्यांनाही तर सण साजरा करण्याचा हक्क आहे. हाच विचार करून मनसेनं स्मशानभूमीत दिवाळी साजरी केली. मनसेचे नगरसेवक दीलीप लांडे यांनी कर्मचाऱ्यांना फराळ आणि भेटवस्तू दिल्या.

एरवी चितेच्या राखेत वावरणाऱ्यांना दिवाळी सण साजरा करता आला. त्यामुळे स्मशानभूमीतील कर्मचारी भारावून गेले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या