मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकारी कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. फेरीवाल्यांकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या होत्या. मंगळवारी घेतलेल्या ३१ ऑगस्ट पत्रकार परिषदेत या घटनेवर भाष्य केल्यानंतर आज (१ सप्टेंबर) स्वतः राज ठाकरे कल्पिता पिंपळे यांच्या भेटीसाठी ठाण्यात आले.

काहीच वेळापूर्वी राज ठाकरे हे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांची विचारपूस करण्यासाठी दाखल झाले होते. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'मी आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. लवकर बरं व्हा एवढंच सांगितलं आहे', असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं. राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे देखील उपस्थित होते.

'आमचं आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात असतं. मी काल जे म्हटलं त्याप्रमाणे, जे काही घडलं त्याचं निश्चितच  दु:ख आहे. पण काळही सोकावतो. अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांची कारवाई करतच आहेत. न्यायालय देखील त्यांचं काम करेल अशी आमची पूर्ण अपेक्षा आणि आशा आहे', असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या