'वर्गाबाहेचे विद्यार्थी', राज ठाकरेंनी मोदी-शहांना व्यंगचित्रातून फटकारले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह या जोडीला पुन्हा एकदा व्यंगचित्रांच्या माध्यमातून लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह वर्गाबाहेरचे विद्यार्थी असून संघाच्या शिस्तीबाबत या दोघांना विसर पडल्याची टीका राज यांनी केली आहे. त्यांनी हे व्यंगचित्र आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलं आहे.

काय आहे व्यंगचित्रात?

राज यांनी या व्यंगचित्राला 'वर्गाबाहेरचे विद्यार्थी' असं शीर्षक दिले आहे. तर भाजप आणि संघातील विरोधाभासाला लक्ष्य करत मोदी-शाह या जोडीला व्यंगचित्रातून फटकारलं आहे. यामध्ये अमित शाहंचा उल्लेख धाकदपट असा केला असून सिंहासनावर बसलेल्या मोदींच्या पायाशी व्यवस्थेनं लोळणं घातल्याचं व्यंगचित्रात दिसत आहे. 

या व्यंगचित्रात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत एक स्वयंसेवक संवाद साधताना दाखवलं आहे. दुसऱ्या बाजूला संघ ही लोकशाहीवादी संघटना असल्याचं भागवत स्वयंसेवकाला सांगत आहेत. तर स्वयंसेवक मोदी आणि शाहांकडे बोट दाखवत ते दोघे तुमच्या शिकवणीनुसार वागत नसल्याचं सरसंघचालकांना सांगताना दाखवलं आहे.

मोहन भागवतांच्या शिकवणीपासून फारकत घेऊन मोदी - शाह एकाधिकारशाही राबवत असल्यानं त्यांना वर्गाबाहेरचे विद्यार्थी असं संबोधलं आहे. मोदी - शाहांचा एककलमी कार्यक्रम आणि मोहन भागवतांनी संघाबद्दल मांडलेले विचार यातील विरोधाभासावर बोलकं व्यंगचित्र रेखाटलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या