ठाण्यात राज ठाकरेंची जाहीर सभा

फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेेंनी पहिल्यांदा 18 नोव्हेंबरला ठाण्यामध्ये जाहीर सभा घेतली. राज ठाकरेंच्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

पुन्हा खळ्ळ खट्ट्याक आंदोलन?

रेल्वे स्टेशन परिसरातून फेरीवाल्यांना हटवण्यासाठी दिलेलं अल्टिमेटम संपल्यानंतर, मनसेने ठाणे स्टेशनपासून खळ्ळ खट्याक आंदोलनाला सुरुवात केली होती. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर आता फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर लोकांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आले.

कुठे होईल ही सभा?

राज ठाकरेंनी ही सभा ठाण्यात घेतली. आता फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, हे या सभेतून स्पष्ट होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या