'तर, मी न्यायाधीशांसमोर उभा राहणार नाही'- अमेय खोपकर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्वाळ्याविरोधात आता मनसेने बंड पुकरलं असून मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी न्यायाधीशांपेक्षा राष्ट्रगीत मोठं असल्याचं मत व्यक्त करत आपण न्यायालयात न्यायाधीशांसमोर उभं राहणार नाही, असं मत व्यक्त व्यक्त केलं आहे.

चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभं राहणं बंधनकारक नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला होता. राष्ट्रगीतावेळी उभं राहणं म्हणजे देशभक्ती सिद्ध होते असं नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली. खोपकर यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेबाबत पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

खोपकर काय म्हटले ट्विटरवर?

"जन गण मन की बात... न्यायाधीश कोर्टात येतात तेव्हा उभं राहीलं नाही, तर कोर्टाचा अवमान होईल का ? मी नाही उभा राहणार, हे पक्कं ठरवलंय. शेवटी न्यायाधीशांपेक्षा राष्ट्रगीत केव्हाही मोठंच नाही का ?"


हेही वाचा-

अजोय मेहता यांची नार्कोटेस्ट करा: मनसेची मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या