मनसेच्या एकमेव एकनिष्ठ नगरसेवकानेही राज ठाकरेंची सोडली साथ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नव निर्माण पक्षाचे मुंबईतील एकमेव नगरसेवकाने राजीनामा दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुरडे यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. संजय तुरडे यांनी राज ठाकरे यांना भेटून दिला राजीनामा दिला आहे.

संजय तुरडे यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्या असल्याची प्राथमिक माहिती सोमर आली आहे.

मागील महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक निवडून आलेले त्यापैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेत गेले मात्र संजय तुरडे राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. 

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही मोठं विधान केले आहे. मनात आलं तर राज ठाकरेंना आम्ही थेट फोन करु शकतो असं राऊतांनी म्हटल आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून एक सही संतापाची ही मोहीम राबवली जात आहे. राज्यभर मनसेच्या वतीने ही मोहीम राबवली जाणार आहे.

अमित ठाकरेंच्या उपस्थितीत दादर रेल्वे स्थानक इथून या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा राज ठाकरे सत्तेत बसले पाहिजेत अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. 


हेही वाचा

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

पुढील बातमी
इतर बातम्या