संदीप देशपांडे यांच्या गाडीला डम्परची धडक

मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या गाडीला मंगळवारी सकाळी अपघात झाला. त्यांच्या राहत्या घराखालीच हा अपघात झाला. सुदैवाने संदीप देशपांडे यावेळी गाडीमध्ये नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळी पक्षाच्या एका बैठकीसाठी जाण्यासाठी संदीप देशपांडे तयार झाले. त्यांच्या राहत्या घराखालीच त्यांची गाडी उभी होती. मात्र, संदीप देशपांडे गाडीमध्ये बसण्याअगोदरच इनोव्हा गाडीला समोरून येणाऱ्या डम्परने धडक दिली. यामध्ये गाडीच्या मागच्या भागाचं काही प्रमाणात नुकसान झालं.

दरम्यान, याप्रकरणी संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या