एलआयसी भरती : हिंदीच्या सक्तीला मनसेचा विरोध

एलआयसीने नुकतंच देशभरात साडेसात हजारांहून अधिक पदं भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. या भरतीत मुख्य परिक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांची भरती झाल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा मनसेनं दिला आहे. 

 दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतातील उमेदवारांना हिंदीची सक्ती नसल्याने इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही अट रद्द करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याची दखल घेऊन  इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. महाराष्ट्रातील मुलांना हिंदी भाषेची सक्ती केली आहे हे अत्यंत संतापजनक आहे. उत्तर भारतीयांचा प्रत्येक स्थानिक भाषा, संस्कृती डावलण्याचा डाव आहे, असं म्हणत नांदगावकर यांनी या सक्तीचा निषेध केला आहे.  महाराष्ट्रामध्ये जर हिंदी भाषिकांची भरती केलीत तर होणाऱ्या परिणामांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जबाबदार नसेल, असा इशाराही नांदगावकर यांनी दिला आहे.


हेही वाचा  -

पवारांनी मानले शिवसेनेचे आभार

ईडीच्या कार्यालयात जाण्याचा शरद पवार यांचा निर्णय रद्द


पुढील बातमी
इतर बातम्या