मैदान बचावसाठी मनसेचं आयुक्तांना निवेदन

फेरबंदर - म्हाडा संकुलातलं मैदान वाचवण्यासाठी मनसेनं 18 डिसेंबर 2016 रोजी जनमत चाचणी घेतली होती. मैदानावर बांधकाम नको, असाच कौल विभागातील रहिवाशांनी दिला. या जनमत चाचणीतल्या मतांची मोजणी करून मैदान वाचवण्याबाबतचं निवेदन गुरुवारी सायंकाळी मनसे नगरसेविका समिती नाईक यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना दिलं. या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन योग्य तो निर्णय दिला जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं. या प्रसंगी मनसे नेते संजय नाईक आणि भायखळा विभाग अध्यक्ष विजय लिपारेही उपस्थित होते.

काय आहे प्रकरण?

न्यू हिंद मिलच्या आरक्षित मैदानावर महापालिकेस चार मजली इमारत उभारून त्यात पाळणाघर, व्यायामशाळा, समाजकल्याण केंद्र उभारायचं आहे. मात्र, त्याला मनसेनं तीव्र विरोध दर्शवलाय. इथे भूमिगत वाहनतळ तयार करून मैदान सर्वांसाठी खुलं ठेवा, अशी मनसेची भूमिका आहे. बांधकाम केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेनं दिलाय.

न्यू हिंद मिलच्या जागेचा विकास केल्यानंतर म्हाडानं नागरी सुविधांसाठी आरक्षित 1 हजार 575 चौरस मीटरचा मैदानाचा हा भूखंड महापालिकेला तीन वर्षांपूर्वी हस्तांतरीत केला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या