मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याची चौकशी होणार?

मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतेच गुढीपाडव्यावरून मशिद, मदरसे आणि भोंग्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, राज ठाकरे यांच्या वक्तव्याची चौकशी केली जाईल. तपास करूनच त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.

तसंच समाजात तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य आता कोणीही करू नये, असं आवाहनही दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतिर्थावरून ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिलं होतं. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या (masjid) बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा.

“मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

“आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशीदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असं युरोपातील शासन आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले की, “आमच्याकडे मंदिरं आहेत. टाका धाडी. काय मिळणार… घंटा. आमच्याकडे काहीच नाही. म्हणून मला जातीत खितपत पडलेला असा फरफटत जाणारा असला समाज नाही आवडत. असल्या लोकांचं नेतृत्व करायला आवडत नाही. मला आरे ला कारे करणारा समाज हवा. कोणत्याही सत्ताधाऱ्यांची हिंमत होता कामा नये तुमच्याशी गद्दारी करायची,” असं राज ठाकरे म्हणाले.


हेही वाचा

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून संपत्ती जप्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले आजोबा, कुटुंबात चिमुकल्याचे आगमन

पुढील बातमी
इतर बातम्या