आता टाळी गालावर - राज ठाकरे

आता हातावर टाळी नाही तर टाळी गालावर असे सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी मिळून नीच राजकारण करत असल्याचा घणाघात रविवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेला समजले आहे की, त्यांनी जे केले आहे ते लोकांना कळले म्हणून ते राज ठाकरेंनी नगरसेवक पाठवले अशी चुकीची माहिती पसरवत आहेत. मी असले राजकारण कधी केले नाही आणि करणार देखील नाही असे देखील राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

तसेच शिवसेनेकडून अशा राजकारणाची अपेक्षा नव्हती असे सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.

काय म्हणालेत राज ठाकरे -

- मी शिवसेनेतून बाहेर पडताना देखील बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो

- यांच्या नीच राजकारणाचा कंटाळा आला होता म्हणून मी बाहेर पडलो

- मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा शिवसेनेचे अनेक आमदार आणि नगरसेवक माझ्यासोबत बाहेर पडत होते

- तेव्हा मी यांच्यासारखं घाणेरडं राजकारण केलं नव्हतं

- हे असले राजकारण बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही

- पाच-पाच कोटी देऊन सहा घ्यावेत हे माझं राजकारण नाही

- शिवसेनेचे नगरसेवक म्हणतात आम्ही दुसऱ्या पक्षत असतो तर बरं झालं असतं. आम्हाला कधी आमच्या पक्षाकडून पैसे मिळत नाहीत पण बाहेरच्या नगरसेवकांना पैसे देऊन घेतात

- हा नीचपणा मी कधीच विसरणार नाही

- भिकार राजकारण करून काय मिळवलात

- जे फुटले ते दळभद्री आहेत

- जे मानसिक दृष्ट्या भ्रष्ट झालेले आहेत त्यांना मी पक्षात ठेऊन काय करू

- मला याची कुणकुण दोन महिन्यांपूर्वी लागली होती

- हा असला पायंडा मला राजकारणात पाडायचा नाही

- छाती पुढे करून जा पैसे खाऊन कसले जाता

- महानगर पालिकेत हे कसे वागतात हे मला कळलं होतं. यांना दोन तीन- वेळा मी समजवून सांगितले होते

- शिवसेनेने मराठी माणसाचा विश्वासघात केला

- यांचे लक्ष महापौर बंगल्यावर

- हे विकले गेलेले आहेत. याना विकत घेतले गेले आहेत. जवळपास 30 कोटींचा सौदा झाला हे पैसे कुठून आले

- आधी विचारलं असते तर दिले असते

- मला शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती

- पवारांनी फोडाफोडीच्या राजकारणावर बोलू नये

पुढील बातमी
इतर बातम्या