११वी प्रवेशाप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अकरावीसह इतर इयत्तांचे प्रवेश रखडले आहेत. तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे राज्यातील कोचिंग क्लास सुरू झालेले नाहीत. त्यामुळं राज्यातील ग्रंथालय सुरु झाल्यानंतर आता कोचिंग क्लास पुन्हा सुरु करण्यासाठी मालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पालक संघटनेसह कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

राज ठाकरेंनी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेत थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी संध्याकाळी याबाबत बैठक आहे. उद्यापर्यंत कळवतो, असे वर्षा गायकवाड यांनी राज ठाकरेंना सांगितल्याची माहिती मिळते.

या भेटीत पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांचे शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली. यावेळी कोचिंग क्लासचे शिष्टमंडळाने काही मागण्या राज ठाकरेंकडे मांडल्या. या मागण्या सरकार दरबारी मांडा, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे मांडली.

यानंतर राज ठाकरेंनी क्षणाचाही विलंब न लावता थेट वर्षा गायकवाड यांना फोन केला. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं राज यांनी वर्षा गायकवाड यांना सांगितलं. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली असून, लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे राज यांना सांगितल्याचं समजतं.

पुढील बातमी
इतर बातम्या