संदीप देशपांडे आणखी एका वादात

मुंबई - पालिकेच्या अभियंत्याला खड्ड्यात उभे करण्याचा वाद संपत नाही तोच मनसेचे गटनेते संदीप देशपांडे एका नव्या वादात अडकलेत. मनसेच्या नगरसेविका गीता चव्हाण यांनी संदीप देशपांडेंविरोधात आझादनगर पोलिसात तक्रार केलीय. संदीप देशपांडे यांनी बनावट लेटरहेड आणि बनावट सहिद्वारे महिला बालकल्याण समिती सदस्य पदाचा राजीनामा मंजूर करून घेतल्याचा आरोप गीता यांनी केलाय.

गीता चव्हाण यांचे पती बाळा चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचाच राग धरून सुडबुद्धीनं देशपांडे यांनी हे कटकारस्थान केल्याचा आरोप गीता चव्हाण यांनी केला. "21 ऑक्टोबरला महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत राजीनामा संदर्भात मला कळालं. पण मी राजीनामा दिला नाही. याप्रकरणी मी आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केलीय." असं गीता चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या