पालिकेची खड्डे बुजवा मोहीम

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

अॅन्टॉप हिल - महानगर पालिकेच्या वतीनं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. दोस्ती एकर्स या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम पालिकेच्या वतीनं हाती घेण्यात आलंय. मनसेचे शाखा अध्यक्ष 'संजय बन्सी रणदिवे' यांनी वडाळा पोलीस ठाणे ते शांती नगर या एकाच रस्त्यावरील ५० खड्यांचे फोटो पालिकेला पाठवले होते. त्यानंतर पालिकेकडून या परिसरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलीय. तसंच हे खड्डे लवकर बुजवले जातील, असं कामगारांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या