चार्जर आले, पण टॅब बिघडले

मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमधील आठवी आणि नववीच्या विदयार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅबच्या चार्जिंगची व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली. 91 लाख रुपये खर्च करत स्पाईक गार्ड बसवण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीतही मंजुरी देण्यात आली. पण आता चार्जिंग कशाचे करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकणार आहे. कारण पालिकेकडून वितरीत करण्यात आलेले टॅबच बिघडले आहेत. मनसेनं नादुरूस्त टॅबची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे शिवसेनेची आता चांगलीच कोंडी झाल्याची चर्चा आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या