मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आचारसंहितेचा भंग

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

प्रतीक्षानगर - या परिसराती काही मनसे कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा आरोप करण्यात आला आहे. मनसेतर्फे बांधण्यात आलेल्या प्रतीक्षानगरच्या स्वराज्य प्रतिष्ठान वाचनालयात इथल्या रहिवाशांकडून पंतप्रधान आवास योजेनेंतर्गत ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात होते. यादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी वाचनालयाच्या बाहेर पक्षाचे झेंडेही लावले.

आचारसंहिता लागू असताना ऑनलाइन अर्ज भरण्याच्या नावाखाली पक्षाची जाहिरातबाजी केली जातेय, अशी माहिती सूत्रांकडून कळताच 25 जानेवारीला महानगरपालिकेच्या आचारसंहिता पथकाने तिथल्या कार्यकर्त्यांना मनसेच्या पक्षाचे झेंडे काढायला लावले. त्याचबरोबर वाचनालयात असलेला पक्षाचा बॅनर झाकण्यास सांगितला. अर्ज भरून घेत असलेल्या काही युवा कार्यकर्त्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केली नसली तरी आचारसंहिता असेपर्यंत कुठलेही अर्ज या ठिकाणी भरून घेतले जाऊ नये असे महानगरपालिका आचारसंहिता पथकाकडून सांगण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या