'मी खड्डे केले, तर बुडबुड घागरी'

दादर - पालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून मुंबईत सर्वच पक्षांच्या जाहिरातबाजीचे बॅनर लावले जात आहेत. मनसेचे खड्ड्यांवर निशाणा साधत 'मी खड्डे केले, तर बुडबुड घागरी' हे बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतान दिसत आहेत. या जाहिरातीत खड्ड्यांचे चित्र काढून त्यात घागर बुडताना दाखवण्यात आली आहे. मनसेच्या या जाहिरातबाजीची दादर - प्रभादेवी परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राजकीय पक्षांकडून जाहिरातबाजीसाठी वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत दादरचा गड मनसेने राखण्यात यश मिळवले होते. येत्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी दादरकडे अधिक लक्ष केंद्रीत केले असून शिवसेनेचे कडवे आव्हान पेलत दादरचा गड राखण्याची कसोटी त्यांना द्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या