आता, पावसाळी अधिवेशनही मुंबईऐवजी नागपूरमध्ये?

अार्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उन्हाळी अाणि पावसाळी अधिवेशन रंगतं. त्याद्वारे अनेक प्रश्नांना न्याय दिला जातो. पण अाता मुंबईत होणारं पावसाळी अधिवेशन पुढील वर्षीपासून राज्याची उपराजधानी नागपुरात घेतलं जाण्याची शक्यता. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनीच याबाबत सूताेवाच केलं अाहे.

परंपरा बदलली जाणार

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीदरम्यान तत्कालिन सी.पी. अाणि बेरार प्रांतादरम्यान झालेल्या करारानुसार, राज्याची उपराजधानी नागपूर इथं दरवर्षी विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन घेतलं जातं. मात्र अाता ही परंपरा बदलून नागपुरात पावसाळी अधिवेशन घेण्यात यावं, असा एक विचार अाहे. मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पावसाळी अधिवेशन हे सर्वाधिक काळ चालणारं अधिवेशन असते. त्यामुळे ते नागपुरात घेतल्यास, विदर्भातील प्रश्नांना अधिक न्याय मिळू शकेल, असं काही सदस्यांचं मत अाहे. असे काही सदस्यांचे मत आहे, अशी माहिती बापट यांनी दिली अाहे.

सर्व पक्षांशी चर्चा करू घेणार निर्णय

सर्व पक्षांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात येईल. सर्व पक्षांतील काही सदस्यांनी या बदलाला अापला पाठिंबा दर्शवला अाहे. त्यामुळे सरकार सर्व पक्षांशी चर्चा करून निर्णय घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा निर्णय झाल्यास दरवर्षी ऐन कडाक्याच्या थंडीत नागपुरात होणाऱ्या अधिवेशनाऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाळ्यात नागपुरात विधीमंडळ अधिवेशन होऊ शकतं. १९७५ मध्ये निवडणुकांच्या कारणामुळे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये तर हिवाळी अधिवेशन मुंबईत रंगलं होतं.

पुढील बातमी
इतर बातम्या