बाईक रॅलीच्या नियोजनाची चर्चा सत्र बैठक

वडाळा - सहकारनगर येथील भारतीय क्रीडा केंद्रात मराठा क्रांती मूक मोर्चा नियोजन समितीच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीच्या नियोजनासाठी गुरुवारी चर्चा सत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. येत्या 6 नोव्हेंबरला मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईत दाखल होणार आहे. ही रॅली सोमय्या मैदानावरून सायन सर्कलहून सायन रुग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, लालबाग, भायखळाहून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकासमोर जाऊन धडकणार आहे. सीएसटीला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदना करून रॅली समाप्त होईल. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीत काळे कपडे घालण्यात येणार असून काळ्या रंगाचे झेंडे फडकवण्यात येणार आहेत. तर 50 हजार मोटारसायकल स्वार सहभागी होणार आहेत. दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चोख वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या