मुंबईत 20 टक्के बालकं कुपोषित

मुंबई - कुपोषण हे केवळ आदिवासी पट्ट्यातच असल्याचा गैरसमज खोडून दूर करत एका सर्वेक्षणाने मुंबईकरांना जबर धक्का दिला आहे. महाराष्ट्राच्या शहरांमध्ये15 टक्क्यांहून अधिक कुपोषणाचे प्रमाण असून, त्यातही जिथे कुपोषणाचे प्रमाण देशात 15 टक्के असताना मुंबई महानगरात मात्र तब्बल 20 टक्के मुलं कुपोषित आहेत.

धारावी, मानखुर्द, गोवंडी आणि कुर्ला या विभागात 2011 ते 2015 या वर्षादरम्यान झालेल्या सर्व्हेमध्ये तब्बल 13 टक्के बालकं कुपोषित आहेत. पण सरकारने गांभीर्याने याची दखल घेतली नाही तर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असं क्राय संस्थेच्या ममता सेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. या वेळी स्नेहा संस्थेच्या वेनेसा डिसूझा आणि कुमार निनाई देखील उपस्थित होते.

सुरुवातीला या विभागात बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण 18 टक्के होतं. या सामाजिक संस्थांकडून चालवलेल्या आहार उपक्रम, समुपदेशन, उपयुक्त औषधे आणि प्रत्यक्ष घरी जाऊन केलेली पाहणी आणि संपूर्ण आहाराबाबतच्या समुपदेशनामुळे 2015 नंतर हा आकडा तब्बल 5 टक्क्यांवरून 13 टक्क्यांवर आला आहे

मुंबईमध्ये कुपोषण

  • मुंबई महानगरात 20 टक्के कुपोषित बालकं
  • मानखुर्द,धारावी,गोवंडी,कुर्लामध्ये 13टक्के कुपोषित बालकं
  • 2015 नंतर हा आकडा वाढला.

कुपोषणाची कारणे -

  • योग्य, वेळेवर आणि परवडणार्‍या आरोग्यसेवांच्या उपलब्धतेचा अभाव
  • स्तनपान किंवा पूरक आहाराची कमी गुणवत्ता
  • निकृष्ट अन्नसुरक्षा
  • अन्न साठवण्याच्या, शिजवण्याच्या आणि खाण्याच्या पद्धतींविषयी अपुरे ज्ञान
  • सुरक्षित पाण्याची उपलब्धता, स्वच्छता आणि निरोगी सेवांसह स्वच्छ वातावरणाचा अभाव.
पुढील बातमी
इतर बातम्या