परराज्यातून येणाऱ्या रुग्णांमुळे ताण वाढतोय : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी  पालिका आयुक्त भुषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा मुद्दा मांडला आहे.

परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा फार ताण पालिकेच्या रुग्णालयांवर येतो आणि परिस्थिती बिघडते असं त्यांनी मनपा आयुक्तांना सांगितलं आहे. त्यांच्यावर वेगळे काही चार्जेस लावण्यात येतील का? यासंदर्भात बोलणं झाल्याचं समोर येत आहे.  

"महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुंबई, महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांचा प्रश्न नाही. पण परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा फार ताण पालिकेच्या रुग्णालयांवर येतो आणि परिस्थिती बिघडते. या सगळ्या गोष्टींचं ओझं पालिकेलाचा वाहावं लागत आहे. इतर राज्यांमधून येणारे रुग्ण हवेत की नकोत हा प्रश्न नाही. पण इतर राज्यातून येणारे जे रुग्ण आहेत त्यांच्या तेथील पालिका, लोकं ही काही मुंबई पालिकेला पैसे देऊ करत आहे का? की मुंबई पालिकेने फक्त रुग्ण पाहायचे आणि आपल्या शहर, रुग्णालयावरचा ताण वाढवायचा? वेगळे काही चार्जेस लावण्यात येतील का यासंदर्भात बोलणं झालं आहे," अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.


हेही वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आग्रामध्ये उभारण्यात येणार

हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे अध्यक्ष

पुढील बातमी
इतर बातम्या