मुस्लिम प्रतिनिधी मंडळ आशिष शेलारांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांत गोहत्येच्या मुद्द्यावरून देशात वाद उफाळून आला आहे. त्यामुळे मुंबईक काही ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजिक कार्यकर्त्या पिंकी पंजाबी यांच्या नेतृत्वाखाली खारदांडाच्या निवासी आणि मुस्लिम प्रतिनिधी मंडळांनी 19 जुलै रोजी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली. सोबतच महाराष्ट्रात होत असलेल्या गोहत्येच्या मुद्द्यावरून पसरलेल्या भीतीविषयी चर्चा देखील केली.

2 सप्टेंबर, 2017 रोजी होणाऱ्या बकरी ईद निमित्ताने चर्चा करण्यासाठी खारदांडा, माहिम, जुहू, सांताक्रूझ या विभागातील मुस्लिम धर्मियांनी आशिष शेलार यांची भेट घेत गोहत्येमुळे समाजात पसरलेल्या भीतीविषयीही त्यांनी चर्चा केली. सोबतच मांसाचे नमुने तपासण्यासाठी पोर्टेबल किटची व्यवस्था करावी अशी मागणी देखील प्रतिनिधी मंडळाने केली आहे.

बकरी ईदच्या दिवशी मांस तीन भागात वाटला जातो. एक भाग घरासाठी आणि दुसरा भाग मित्रांसाठी आणि तिसरा भाग गरीबांमध्ये वाटला जातो. गेल्या काही दिवसांत गोहत्येच्या मुद्द्यावरून राज्यात काही हिंसक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुस्लिम प्रतिनिधी मंडळाने आशिष शेलारांची भेट घेतली. यावेळी गायीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासनही आशिष शेलार यांनी दिले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या