नाना पटोले काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी

मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपा सदस्यत्व आणि खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर भाई नगराळे यांची राज्याच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याचं काँग्रेसने जाहीर केले आहे.

राहुल गांधींच्या उपस्थितीत प्रवेश

भंडारा-गोंदीयाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपाच्या नेतृत्वावर टीका करत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तसेच काँग्रसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत देत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या ठिकाणी पटोले यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं.

अखेर अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस जर्नादन द्विवेदी यांनी गुरुवारी पटोले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्रक काढलं. त्यांच्याबरोबर माजी आयएएस अधिकारी भाई नगराळे यांचीही प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या