अॅट्रोसिटी अॅक्टची योग्य अंमलबजावणी करा - डॉ. नरेंद्र जाधव

आझाद मैदान-  अॅट्रोसिटी कायदा रद्द करण्यावरून राज्यभरात रणकंदन सुरू असून मराठा समाजाचे मूकमोर्चे निघत आहेत. हे मोर्चे म्हणजे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून त्यांच्यात संघर्षाची बीजे रूजवण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली.  दलितांच्या संरक्षणासाठी असलेला हा कायदा रद्द करण्याएेवजी त्याची योग्य अंमलबजावणी करावी, असे मतही त्यांनी मुंबई पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त डॉ. जाधव महाराष्ट्रासह, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश  या राज्यांसह देशभरात 125 व्याख्यानं देणार आहेत. दरम्यान, दादर येथील आंबेडकर भवन येथील बुद्धभूषण प्रेस पाडणे हा अपराध असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

पुढील बातमी
इतर बातम्या