नवी मुंबई विमानतळाचा 'रनवे' २०१९ पर्यंत पूर्ण होणार- मुख्यमंत्री

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण होईल. त्यामध्ये टर्मिनलची एक इमारत आणि एका 'रनवे'चा समावेश असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.

९८ टक्के प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामधील ९८ टक्के प्रकल्पग्रस्तांनी संमतीने पुनर्वसन स्वीकारलं आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ५० लाख प्रवासी क्षमता असलेली टर्मिनल इमारत आणि एका 'रनवे'चा समावेश आहे. डिसेंबर २०१९ अखेर पहिला टप्पा पूर्ण होणार असून त्यानंतर दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीत दुसरा टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यानी या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या