नवाब मलिकांचा भाजपावर आरोप

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपानं एमआयएमच्या खांद्यावर हात ठेवून निवडणूक जिंकली, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. भाजपानं निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केलाय. तसंच भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या हेलिकॉप्टरचा वापर नोटा ठेवण्यासाठी केल्याचा आरोपही मलिक यांनी केला. तसंच भाजपाकडून निवडणूक लढवण्यासाठी एका नगरसेवकाला 15 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी भाजपावर केला. याचबरोबर वृत्तपत्रांनी राष्ट्रवादीला चौथ्या नंबरचा पक्ष ठरवलं. हे पूर्णपणे चूक असल्याचंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाचं खंडण केलं. भाजपाला एमआयएममुळे कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसल्याचं स्पष्टीकरण भांडारी यांनी दिलं. राष्ट्रवादी पक्षाला पराभवही स्वीकारणं अवघड होत असल्यानं त्यांच्याकडून अशा पद्धतीचे आरोप होतं असल्याचं माधव भांडारी यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या